We provide GOM Satbara, Valuation, Mojani online (apkid: gom.satbara.valuation.mojani) in order to run this application in our online Android emulator.


Description:

Download this app named GOM Satbara, Valuation, Mojani.

सातबारा उतारा व जमीन मोजणी
----------------------------------------------------
आपल्यापैकी अनेकजण नोकरीधंद्यानिमित्ताने किंवा इतर काही कारणाने आपल्या मूळ गावापासून इतर ठिकाणी म्हणजे शहरात किंवा इतरत्र स्थायिक झालेले दिसतात.
बर्‍याचदा त्या मूळ गावात आपल्या काही वडिलोपार्जित किंवा स्वकष्टार्जित मिळकती तसेच जमिनीदेखील असतात.
आपल्या आजी-आजोबा,आई-वडिलांच्या पिढीला जमिनीसंदर्भातल्या थोड्यातरी कायदेशीर बाबी ते त्या गावच्या ठिकाणी राहात असल्याने माहीत असायच्या.
आपल्या पिढीला मात्र गावापासून लांब राहील्यामुळे सातबाराचे उतारे,फेरफारपत्रक्,वारसाहक्क व त्याबद्दलचे कायदे इत्यादीविषयी फार माहिती असलेली दिसत नाही.
तेव्हा आपण सातबारा उतारा या जमिनीसंदर्भात अत्यंत महत्वाच्या अशा उतार्‍याची माहिती करुन घेणार आहोत.
आपल्या महाराष्ट्राची जिल्हे,तालुके,गावे,खेडी यात विभागणी झालेली आहे.यात जे जमिनीचे क्षेत्र आहे,या सर्व क्षेत्रात सर्वसाधारणपणे जे डोंगर, नदी,नाले व समुद्राच्या किनार्‍याच्या भरतीच्या खुणेपर्यंतचा जो भाग असतो तो शासकिय मालकीचा असतो.
इतर राहिलेले जमिनीचे जे क्षेत्र असते त्यात शेतीसाठी वापरात असलेली जमिन,पडिक जमिन,माळरान जमिन,गावठाण अशा बर्‍याच प्रकारच्या जमिनीचा समावेश होतो.
७/१२ चा उतारा म्हणजे काय?
सातबारा उतारा म्हणजे जमिनीचा एक प्रकारचा आरसाचं.
कारण हा उतारा वाचून प्रत्यक्ष जमिनीवर न जाता त्या जमिनीचा संपूर्ण अंदाज आपल्याला बसल्या जागी मिळू शकतो.महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र जमिन महसूल कायदा १९६६ अंतर्गत शेतजमिनींच्या हक्कांबाबत विविध नोंदणी ठेवल्या जातात.
यासाठी वेगवेगळी नोंदणीपुस्तके असतात(रजिस्टर बुक्स) या रजिस्टर मध्ये कुळांचे मालकी हक्क, शेतजमिनीचे हक्क, त्यातल्या पिकांचे हक्क यांचा समावेश असतो.
तसेच यासोबत २१ वेगवेगळ्या प्रकारचे गावचे नमुने ठेवलेले असतात.
यापैकी गावचा नमुना नं ७ आणि गावचा नमुना नं १२ मिळून सातबारा उतारा तयार होतो.
म्हणून त्या उतार्‍याला सातबारा उतारा असे म्हणतात.
७/१२ उतारा काय दर्शवितो?
प्रत्येक जमिनधारकास स्वत: कडे असलेली जमिन किती व कोणती हे सातबारा उतार्‍यावरून कळू शकते.
गाव नमुना ७ हे अधिकारपत्रक आहे व गाव नमुना १२ हे पीकपाहणी पत्रक आहे.जमिन व महसूलाच्या व्यवस्थापनासाठी प्रत्येक गावच्या तलाठ्याकडे हे गाव नमुने असतात.
मिळकतीचे मुल्यांकन -
----------------------------
या सर्व मिळकतींचे मुल्यांकन दर (सरकारी दर) आपण या ॲपद्वारे ऑनलाईन पाहू शकता.
महत्वाचे : -
-------------
सातबारा व मुल्यांकन माहिती ही महाराष्ट्र शासनाच्या संबंधीत विभागाच्या वेबसाईट्सवरीलच असून वापरामध्ये सुलभता आणण्यासाठी त्या वेबसाईटस् ची या ॲपमध्ये फक्त लिंक देण्यात आलेली आहे, याची ॲप डाऊनलोड करण्यापूर्वी नोंद घ्यावी.
मान्य नसल्यास ॲप डाऊनलोड करु नये.
साबतारा वेबसाईट - Satbara Website
http: //mahabhulekh.maharashtra.gov.in
मुल्यांकन वेबसाईट - Valuation Website
http: //igrmaharashtra.gov.in

Updates:

* Improved speed * Bugs Fixed

 

 

Free download Android GOM Satbara, Valuation, Mojani from MyAndroid.net

MyAndroid is not a downloader online for GOM Satbara, Valuation, Mojani. It only allows to test online GOM Satbara, Valuation, Mojani with apkid gom.satbara.valuation.mojani. MyAndroid provides the official Google Play Store to run GOM Satbara, Valuation, Mojani online.

Page navigation:

©2025. MyAndroid. All Rights Reserved.

By OffiDocs Group OU – Registry code: 1609791 -VAT number: EE102345621.